मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस; पश्चिम रेल्वे विस्कळीत

April 5, 2016 8:51 AM0 commentsViews:

rain in mumbai

मुंबई – 05 एप्रिल :  मुंबईसह उपनगरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावासाने हजेरी लावली. अंधेरीसह बोरिवली व विरार भागात सकाळी सातच्या सुमारासच पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. चाकरमान्यांची यामुळे चांगलीच धांदल उडाली. पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

दादर, भायखळा भागांतही ढगाळ वातावरण आहे. तिथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहेत. दुसरीकडे, प. रेल्वेवरील बोरिवलीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने विरार- चर्चगेट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close