मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी पुन्हा यशोधर फणसेंची निवड

April 5, 2016 4:28 PM0 commentsViews:

mumbai_palikaमुंबई – 05 एप्रिल : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी यशोधर फणसे यांची पुन्हा निवड झाली आहे. यशोधर फणसेंना 14 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या सुनील मोरेना 8 मतं मिळाली. एकूण 27 सदस्यांपैकी मनसेचे नगरसेवक गैरहजर राहिले. सपाचे 3 नगरसेवक हजर होता तर 1 नगरसेवक तटस्थ राहिला.

जात पडताळणी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं भाजपच्या दिलीप पटेल यांना मतदान करता आलं नाही. सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीतला बेबनाव आयबीएन लोकमतनं समोर आणला होता, सेनेनं भाजपला विचारात न घेता आठही प्रभाग समित्यांसाठीचे अर्ज भरले होते. त्यानंतर भाजप आज होणार्‍या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सेनेला मतदान करतं का याविषयी शंका निर्माण झाली होती. पण, आज मात्र मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी केली. महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. ही निवड सामोपचारानं झाली, भाजपच्याही नगरसेवकांनी वरळीकर यांना मतदान केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close