रेपो रेटमध्ये कपात ; गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार

April 5, 2016 4:35 PM0 commentsViews:

rbi-repo405 एप्रिल : कर्जदारांना रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलाय. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी द्विमाही पतधोरण जाहीर केलंय. त्यामध्ये पाव टक्क्याने व्याजदर घटवण्यात आलाय. रेपो रेट 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आलाय. त्यामुळे गृहकर्जदारांना ही आनंदाची बातमी आहे. कारण, यामुळे गृहकर्जाचा हप्ता कमी होणार आहे.

तर सीआरआर दरात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. द्विमाही पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर “जैसे थेे’ ठेवले आहेत. रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता होती पण फक्त 0.25 टक्केच कपात करण्यात आलीये.

दरम्यान, पाव टक्यांनी रेपो रेट कमी केल्याच्या निर्णयाचं उद्योग जगतानं मात्र तेवढं स्वागत केलेलं दिसत नाहीये. मुंबई शेअर बाजार आता पर्यंत जवळ जवळ 400 अंशांनी कोसळलाय. अर्ध्याटक्क्यांची अपेक्षा असताना पाव टक्का कपात केल्यानं गुंतवणुकदार निराश झाल्याचं कारण या मागे असावं असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय.

रेपो रेट म्हणजे काय ?
– ज्या व्याजदरानं रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज देते, त्या दराला रेपो रेट असं म्हणतात
– महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व बँक रेपो रेट कमी-जास्त करत असते
– महागाई वाढली तर रेपो रेट वाढवला जातो
– यामुळे बाजारातला पतपुरवठा कमी होतो, आणि महागाई कमी होण्यास मदत होते
– दर 2 महिन्यांनी रेपो रेटचा आढावा घेतला जातो


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close