लातूरला मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी नेणार, एकनाथ खडसेंची घोषणा

April 5, 2016 4:40 PM0 commentsViews:

Eknath kahdseसांगली -05 एप्रिल : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरला रेल्वेद्वारे पाणी देण्याच्या हालचालींना वेग आलाय. मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी लातूरला नेण्यात येणार आहे. पाणी पुरवण्याच्या दृष्टीनं कामाला लागा असे आदेशही राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

या संदर्भात एक महत्त्वाची बैठक मिरजमध्ये पार पडली. या बैठकीला एकनाथ खडसे, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कृषिमंत्री एकनाथ खडसे आज लातुरलाही जाणार आहेत. लातूरमध्येही महत्वाची बैठक होणार आहे. त्याआधी पंढरपूरमध्येही एक बैठक होणार आहे.

रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेनंतर गुढीपाडव्यापर्यंत लातूरला पाण्याची पहिली रेल्वे मालगाडी पोहचणार असल्याचं घोषित करण्यात आलं. त्याचदृष्टीनं लातुरमध्ये रेल्वेनं पाणी आणण्याच्या प्रयत्नांना वेग आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close