लातूरनंतर आता परभणीत ‘पाणीबाणी’, कलम 144 लागू

April 5, 2016 4:49 PM0 commentsViews:

parbhani_waterपरभणी – 05 एप्रिल : लातूर पाठोपाठ आता परभणी शहराचा पाणी प्रश्न आता पेटत चालला आहे. त्यामुळे शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

अर्ध्या शहरात पाणी पाईप लाईन नसल्याने शहरवासियांना 3 जलकुंभावरून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, खाजगी टँकर चालक याठिकाणी दादागिरी करत असून वारंवार वाद उद्धवत आहेत. इथल्या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना दमदाटी करून मारहाण ही होत असल्याने मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे या जलकुंभांवर कलम 144 लागू करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी तत्काळ या 3 जलकुंभ परिसरात 4 एप्रिल ते 3 मे दरम्यान कलम 144 (प्रतिबंधात्मक आदेश ) लागू केला. मनपाच्या कर्मचारी अधिकारी आणि मनपाचे अधिकृत टँकर चालक यांच्याशिवाय याठिकाणी कुणालाही प्रवेश करता येणार नसून प्रवेश अथवा वाद निर्माण केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close