‘माझा अतिरेक्यांशी संबंध नाही’

March 20, 2010 12:31 PM0 commentsViews: 3

20 मार्च दिल्लीतील बाटला हाऊस एन्काऊंटरमधील इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांशी आपला संबंध नाही, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे. आज एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यातील एक अतिरेकी शाहजाद याच्या वडिलांना 20 वर्षांपूर्वी सौदी अरेबियात भेटलो होतो. पण मी शाहजादला ओळखत नाही, असे ते म्हणाले. मुंबईत अटक केलेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो, असेही ते यावेळी म्हणाले.

close