आव्हाडांनी तिरंग्याला तोंड पुसलं, शेलारांचा आरोप

April 5, 2016 5:12 PM0 commentsViews:

shelar_on_awadh305 एप्रिल : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिरंगा ध्वजाला तोंड पुसल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावाही शेलार यांनी केला.

‘भारत माता की जय’ या वादानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तिरंगा ध्वजाचं अवमान झाल्याच्या घटनेकडे लक्ष्य वेधलंय. आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय. एक व्हिडिओ क्लिपचा दुजोरा देत आशिष शेलार यांनी आव्हाडांवर तिरंग्याला तोंड पुसल्याचा आरोप केलाय. जितेंद्र आव्हाड डाव्या हातात तिरंगा ध्वज घेऊ फिरत होते आणि दुसर्‍या क्लिपमध्ये आव्हाडांनी तिरंग्याने तोंड पुसावं असं स्पष्टपणे दिसत आहे असा दावा शेलारांनी केलाय. भारत माता की जय न म्हणणार्‍या आमदारांवर कारवाई झालीये आता तिरंगा ध्वजाचा अवमान झाला असून आव्हाडांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही शेलार यांनी केली.

तर आशिष शेलार तिरंगा ध्वजावरुन विनाकारण राजकारण करत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. विखे पाटील बोलण्यासाठी उभे राहिले असता भाजपच्या आमदारांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close