प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंगविरोधात गुन्हा दाखल

April 5, 2016 5:57 PM0 commentsViews:

pratyusha banejeeमुंबई – 05 एप्रिल : ‘बाल वधू’ फेम  प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 306, 504, 506 आणि 323 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रत्युषाच्या आई वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. तिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तीच्या आत्महत्येचं कारण काय याची चौकशी सुरू आहे. आज तिच्या आई वडिलांनी राहुलच प्रत्युषाच्या आत्महत्येला कारणीभूत आहे असा आरोप करत गुन्हा दाखल केलाय. प्रत्युषा आणि राहुल हे दोघेही लिव्ह ऍण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. ते दोघेही लग्न करणार होते. पण, राहुल हा लग्न करण्यास टाळाटाळ करत होता असंही आता समोर येतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close