सरकारकडून अण्णांची दिशाभूल

March 20, 2010 12:38 PM0 commentsViews: 7

अद्वैत मेहता, आशिष जाधव20 मार्चराज्य सरकारच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले. पण प्रत्यक्षात सरकारने अण्णांची दिशाभूल केली आहे. मंत्रालयातील दालने आणि बंगल्यावर मंत्र्यांनी कोट्यवधी रुपये उधळले. मात्र अण्णापुढे खोटा खर्च मांडून सरकारने त्यांची बोळवण केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.मंत्रालयातील दालन आणि बंगल्यांवर गरज नसताना मंत्र्यांनी मनमानी खर्च केला. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 18 कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांवर एकूण 5 कोटी 81 लाख रुपयांचा खर्च केला. तर 11 राज्यमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर 1 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च केला. पण हा खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रेकॉर्डवरचा आहे. प्रत्यक्षात मंत्र्यांनी हा खर्च आपापल्या खात्याच्या निधीतून केला आहे.तर माझ्याकडे याबाबत काहीही माहीती नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडेच याविषयी माहिती मिळेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण सांगतात. आणि मला खोटी माहिती सांगितली असेल तर सरकारला त्याचा जाब विचारावा लागेल. आणि संबंधित मंत्र्यांकडून खर्च वसूल केला पाहिजे, असे अण्णांनी म्हटले आहे. मंत्र्यांची ही उधळपट्टी उघडपणे सर्वांनी बघितली आहे. त्यामुळे सरकारचे म्हणणे अण्णांना पटो किंवा न पटो, जनतेला ते पटणार नाही एवढे मात्र नक्की.मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांवर केलेली उधळपट्टी पुढीलप्रमाणे- कॅबिनेट मंत्र्यांचे 18 बंगले एकूण खर्च – 5 कोटी 81 लाख रुपयेराज्यमंत्र्यांचे 11 बंगले एकूण खर्च – 1 कोटी 80 लाख रुपयेबंगला- वर्षा, तोरणा अशोक चव्हाणखर्च – 65 लाख रुपयेछगन भुजबळबंगला – रामटेकखर्च – 10 लाख रुपयेसुनिल तटकरेबंगला – मेघदूतखर्च – 50.50 लाख रुपयेशिवाजीराव देशमुखबंगला – अजंठाखर्च – 34 लाख रुपयेराधाकृष्ण विखे-पाटीलबंगला – सागरखर्च – 5 लाख रुपयेदिलीप वळसे-पाटीलबंगला – शिवगिरीखर्च – 15 लाख रुपयेपद्माकर वळवीबंगला – रॉकी हिल फ्लॅट क्रं – 10खर्च – 5 लाख रुपयेजयदत्त क्षीरसागरबंगला – सातपुडाखर्च – 88 लाख रुपयेअनिल देशमुखबंगला – जेतवनखर्च – 72 लाख रुपयेमनोहर नाईकबंगला – पुरातनखर्च – 39 लाख रुपयेशिवाजीराव मोघेबंगला – मुक्तागिरीखर्च – 23 लाख रुपयेआर. आर. पाटीलबंगला – चित्रकुटखर्च – 29 लाख रुपयेराजेंद्र दर्डाबंगला – नंदनवनखर्च – 5 लाख रुपयेपतंगराव कदमबंगला – अग्रदूतखर्च – 48.50 लाख रुपयेजयंत पाटीलबंगला – रॉयलस्टोनखर्च – 38 लाख रुपयेनारायण राणेबंगला – ज्ञानेश्वरीखर्च – 44.50 लाख रुपयेहर्षवर्धन पाटीलबंगला – पर्णकुटीखर्च – 5 लाख रुपये

close