भुजबळांना आणखी एक धक्का, ‘अशोका ब्लिडकॉन’च्या कार्यालयावर छापे

April 5, 2016 8:43 PM0 commentsViews:

Chhagan-Bhujbal-670x320नाशिक – 05 एप्रिल : नाशिकमध्ये भुजबळांचा फार्म हा अशोक ब्लिडकॉनच्या पैशातून उभारलाय असा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर आज नाशिकमध्ये अशोका ब्लिडकॉनच्या कार्यालयावर ईडी, मुंबई अँटी करप्शन आणि इन्कमटॅक्स विभागाने संयुक्तपणे छापा टाकले आहेत.

मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आज आणखी एक धक्का बसलाय. भुजबळांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी आज तीन संस्थांचं चौकशी पथक आज नाशिकमध्ये दाखल झालं. ईडी, मुंबई अँटी करप्शन आणि इन्कमटॅक्सच्या अधिकार्‍यांचा समावेश या पथकात होता.

अशोका ब्लिडकॉनचे अशोक कटारिया यांनी भुजबळांना बंगला बांधण्यासाठी 40 कोटी रूपये दिल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यासंबंधातली कागदपत्रही त्यांनी दिली होती. त्यासंदर्भात या धाडी घातल्या गेल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. कटारियांना या बदल्यात मोठ मोठी कंत्राटं भुजबळांनी दिली असल्याचाही आरोप त्यांच्यावर होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close