औरंगाबादमध्ये प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर

March 20, 2010 12:43 PM0 commentsViews: 1

20 मार्च औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेने 36 उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर भाजपनेही 14 उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढणार्‍या मनसेने 46 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या शहर प्रगती आघाडीत जागावाटप झालेले असले तरी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. 22 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

close