भुजबळांच्या ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीच्या मालमत्तेचा होणार लिलाव

April 5, 2016 10:33 PM0 commentsViews:

bhujbal_new05 एप्रिल : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पाय आणखी खोलात गेलाय. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांचा बँकांनी आता लिलाव करायला सुरुवात केलीये.

एसबीआयनं त्यांच्या आर्मस्ट्राँग एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या लिलावाची जाहीर नोटीस दिली आहे. 6 कोटी 8 लाख 84 हजार सहाशे 17 रुपये आणि त्यावरचं व्याज एवढी थकबाकी आहे. म्हणून बँकेनं या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज नाशिकमध्ये अशोका ब्लिडकॉनच्या कार्यालयावर ईडी, मुंबई अँटी करप्शन आणि इन्कमटॅक्स विभागाने संयुक्तपणे छापा टाकले आहेत. भुजबळांचा फार्म हा अशोक ब्लिडकॉनच्या पैशातून उभारलाय असा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर हे छापे टाकण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close