नागपुरातील समता सहकारी बँकेचा परवाना रद्द

March 20, 2010 1:08 PM0 commentsViews: 4

20 मार्च नागपूरच्या समता सहकारी बँकेचा परवाना अखेर रिझर्व बँकेने रद्द केला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या आहेत. याआधीच रिझर्व बँकेने समता बँकेवर बंधने घातली होती. रिझर्व बँकेने बँकिंग रेग्युलेशन ऍक्टप्रमाणे 4 ऑगस्ट 2006 रोजी बँकेवर बंधन घातली होती. समता बँकेच्या प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून कर्जाचे वाटप केले होते. समता बँकेची पुन्हा उभी करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती . 8 मार्चला यासंबंधी मुंबईत बैठकही घेण्यात आली होती.

close