…हा तर माझ्या नावाचा गैरवापर, पनामा पेपर्स लीकवर बिग बींनी सोडलं मौन

April 5, 2016 11:03 PM0 commentsViews:

amithabh_bachan_Incredible_Indiaमुंबई – 05 एप्रिल : पनामा पेपर्स लीकमध्ये बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव करबुडव्यांच्या यादीत आल्यामुळे एकच खळबळ उडालीये. अखेर या प्रकरणावर अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलंय. ज्या काही कंपन्यांची नाव जाहीर झाली त्या कंपन्यांची नावं मला माहिती नाही असा खुलासा बिग बींनी केलाय. माझ्या नावाचा गैरवापर केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

अमिताभ बच्चन यांनी मीडियासाठी एक पत्रक प्रसिद्ध केलंय. इंडियन एक्स्प्रेसने ज्या कंपन्यांची नावं जाहीर केली त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. सी बल्क शिपिंग कंपनी लिमिडेट, लेडी शिपिंग लिपिटेड, ट्रेजर शिपिंग लिमिटेड आणि ट्रंफ शिपिंग लिमिटेड या कंपनांसोबत आपला कोणताही संबंध नाही असं बिग बींनी स्पष्ट केलंय. तसंच माझ्या नावाचा गैरवापर झाला असण्याची शक्यता आहे. माध्यमांनी जाहीर केलेल्या कोणत्याही कंपनीला मी ओळखत नाही आणि मी कधीही त्यांच्या संचालकपदी नव्हतो. मी परदेशात होणार्‍या खर्चासह सगळे कर भरले आहेत असंही बिग बींनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close