आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पुण्यात तरूणाला अटक

April 6, 2016 9:36 AM0 commentsViews:

Terror attack131

पुणे- 06 एप्रिल : आयसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या अब्दुल रौफ या व्यक्तीला काल (मंगळवारी) संध्याकाळी पुण्यात अटक करण्यात आली. हवाला एजंट इस्माईल अब्दुल रौफ याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन एनआयएने ही कारवाई केली. रौफ हा भारतातून आयसिससाठी तरूणांची भरती करण्याचे काम करत होता. इस्माईल अब्दुल रौफ हा कर्नाटकच्या भटकळ इथला मूळचा रहिवासी आहे. रौफ पुणे विमानतळावरुन दुबईला जात होता. तिथून तो आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून एनआयएची अब्दुल रौफच्या मागावर होती. रौफ इंटरनेट चॅटच्या माध्यमातून आयसिसमध्ये भरती करण्यासाठी तरुणांचा शोध घेत होता. काही महिन्यांपूर्वी आयसिससाठी काम करीत असल्याच्या संशयावरून देशभरात विविध ठिकाणी 14 जणांना अटक करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close