महापौर बोलल्या की वृत्तपत्र खपतात, स्नेहल आंबेकर यांची मुक्ताफळं

April 6, 2016 11:47 AM0 commentsViews:

Snehal Ambekar

मुंबई – 06 एप्रिल : महापौर बोलल्या की वृत्तपत्र खपतात, अशी मुक्ताफळं मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी उधळली आहेत. स्नेहल आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी काल (मंगळवारी) निवडणूक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी महापौरांना कोपरखळी मारली. स्थायी समितीत महापौर आल्यात, पण काहीच बोलत नाहीत. त्या गप्प आहेत. त्या बोलल्या तर तात्काळ बातम्या होतात, असा टोला प्रवीण छेडा यांनी हाणला.

त्यावर उत्तर देताना स्नेहल आंबेकरांनी, हो, महापौर बोलल्या की वृत्तपत्रांची विक्री वाढते, अशी गुगली टाकली. महापौरांच्या या उत्तरामुळे शिवसेनेचे नगरसेवक गांगरलं. पुन्हा वाद निर्माण होणार अशी चिन्हे निर्माण झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close