पुण्यात कोथरुड परिसरात पुन्हा वाहनजळीतकांड

April 6, 2016 10:36 AM0 commentsViews:

Pune fire

पुणे- 06 एप्रिल : पुण्यातलं वाहनजळीतकांड काही केल्यास थांबता थांबेना. कोथरूड इथल्या किष्किंदा नगरमध्ये काल (मंगळवारी) रात्री 8 दुचाकी गाड्या जाळण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभरात पुण्यामध्ये घडलेले हे चौथं जळीतकांड आहे.

या दुचाकींना काल रात्री दोन-अडीचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. हा परिसर संपूर्णपणे मोकळा असल्याने ही आग अन्य कोणत्या कारणामुळे लागली नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात दुचाकी जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close