2002-03 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तिघांना जन्मठेप

April 6, 2016 12:59 PM0 commentsViews:

mumbai-blast21

मुंबई – 06 एप्रिल :  मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आज (बुधवारी) टाडा विशेष न्यायालयाने प्रमुख दोषी मुजम्मील अन्सारीसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, अन्य 7 दोषींनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या दरम्यान रेल्वेमध्ये मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले या ठिकाणी झालेल्या 3 बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तब्बल 13 वर्षांनी विशेष न्यायालयाने 10 जणांना दोषी ठरवलं होतं. तर तिघांची पुरेश्या पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली होती. या सर्व दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली.

मुजम्मील अन्सारी, फाहीम खोत, वाहीद अन्सारी या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साकीब नाचन, असीफ मुल्ला, अमील मुल्ला यांना 10 वर्षांची तर, अन्वीर अलील, मोहम्मद कामील, नूर मोहम्मद, अन्वर अली यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close