विखे पाटलांच्या प्रवरा साखर कारखान्यात स्फोट, 3 ठार

April 6, 2016 3:40 PM0 commentsViews:

êÖêËêÖêËêy

शिर्डी – 06 एप्रिल : काँग्रेसचे नेते राधा कृष्ण विखे पाटलांच्या प्रवरा साखर कारखान्यातील मळीच्या टाकीच्या स्फोटात 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 12 जणं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आणखी कामगार दबल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

प्रवरा नगर इथली प्रवरा साखर कारखान्याच्या परिसरातील मळीच्या टाकीत भीषण स्फोट झाला. या ठिकाणी काम करत असलेले 3 कामगार जागीच ठार झाले असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close