कोल्हापुरात आरपीआयकडून रास्ता-रोको

March 20, 2010 1:17 PM0 commentsViews: 5

20 मार्चकोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पुणे- बेंगळुरू हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा 850 कोटींचा निधी इतरत्र वळवला आहे. तसेच कर्जमाफी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि घरकुल योजनेचा बोजवाराही उडाला आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. मागासवर्गीय महामंडळांची जाहीर केलेली 1100 कोटींचे कर्ज माफ करावे, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे वाहतूक अर्ध्या तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.

close