दोन नव्या टीमसाठी उद्या चेन्नईत लिलाव

March 20, 2010 1:33 PM0 commentsViews: 2

20 मार्चआयपीएलचा तिसरा हंगाम सुरू होऊन आता एक आठवडा उलटला आहे. आता चर्चा सुरू झाली आहे, ती आयपीएलच्या चौथ्या हंगामाची. आयपीएलमध्ये समावेश होणार्‍या दोन नव्या टीमसाठी उद्या चेन्नईत लिलाव होणार आहे.पुढच्या वर्षी होणार्‍या आयपीएलमध्ये समावेश झालेल्या पुणे आणि अहमदाबाद या दोन नव्या टीमच्या मालकीविषयी लिलाव होणार आहे. पुण्याच्या टीमसाठी व्हिडिओकॉन समुहासह पुण्यातील दोन स्थानिक कंपन्याही पुण्याची फ्रँचाईजी मिळवण्यासाठी उत्सुक आहे. व्हिडिओकॉनने सर्वाधिक मोठी निविदा सादर केली आहे. याशिवाय सीटी कॉर्पनेही निविदा सादर केली आहे. तर सायरस पुनावाला आणि अजय शिर्के यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या फ्रँचाईजीसाठी अडाणी उद्योगसमूह उत्सुक असल्याची चर्चा आहे.नव्या फ्रँचाईजीसाठी तब्बल 225 कोटी डॉलर इतकी बेस प्राईस ठरविण्यात आली आहे. बड्या कंपन्यांसोबतच राजकारण्यांचेही लक्ष या स्पर्धेकडे गेले आहे.

close