स्टेट बँकेमध्ये मेगा भरती

April 6, 2016 6:32 PM0 commentsViews:

sbi_bankमुंबई – 06 एप्रिल : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मेगाभरती केली जाणार आहे. देशभरात बँकेतर्फे लिपिक पदासाठी 15 हजारांपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. यात महाराष्ट्रासाठीच्या साधारणतः साडेसातशे जागांचा समावेश आहे.

कनिष्ठ सहायक आणि कनिष्ठ कृषिसहायक या दोन पदांची ही भरती होईल. 25 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कनिष्ठ सहायकासाठी (ज्युनियर असोसिएट्स – कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) कोणत्याही शाखेतील पदवी तर कनिष्ठ कृषिसहायकासाठी कृषीतील पदवी आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम सेमिस्टरला अथवा वर्षाला असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, अंतिम निवडीच्या वेळी पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close