देशातील अस्वस्थतेचं सरकारला सोयरसुतक नाही – उद्धव ठाकरे

April 6, 2016 6:50 PM0 commentsViews:

Uddhav231206 एप्रिल : सीमेवर लढणारे जवान, सैनिक आणि कामगार या सर्वांचीच अवस्था बिकट आहे. देशात अस्वस्थता आहे पण त्याचं सरकारला सोयरसुतक नाही अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. ते शिवसेनेच्या कामगार मेळाव्यात बोलत होते.

ब्रिटनमध्ये अडचण आल्यावर त्यांचे प्रंतप्रधान परदेशातून परत आले. पण आपले पंतप्रधान देशाबाहेर जातात यावरुनच सरकारला सर्वसामान्य माणसाशी काही घेणं देणं नाही. त्यात भाज्या पेट्रोल सगळच महागलं आहे. त्यामुळे या महागाईत जगायचं तरी कसं असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. सरकारचं नेमकं लक्ष आहे तरी कुठे कारण मल्ल्या पैसे बुडवून पळून जातो आणि सरकारच्या हे नंतर लक्षात येतं यावरुन सरकार नाकर्तेपणा लक्षात येतोय असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close