क्रिकेटचा देव बारामतीत !

April 6, 2016 8:01 PM0 commentsViews:

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज बारामतीत अवतरला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या उद्घाटनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच बारामतीला आलाय. या स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यासाठी बारामती शहर क्रिकेटमय झालंय. या उद्घाटन सोहोळ्यानिमित्तानं मुंबई आणि महाराष्ट्र या रणजी संघात ट्वेंटी-ट्वेंटी सामनाही आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्यासाठी पंचक्रोशितून हजारो लोक जमा झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा