मानकर पुन्हा अडचणीत

March 20, 2010 2:40 PM0 commentsViews: 1

20 मार्चपूर्णिमा प्रभू यांची जमीन बळकावल्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करायला सांगितले आहे. यासाठी कोर्टाने तीन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. या प्रकरणात वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर, त्यांचे भाऊ शिवाजी मानकर हे आरोपी आहेत. 29 डिसेंबर 2008 रोजी पूर्णिमा प्रभू यांचे शिवाजीनगर भागातील घर बळजबरीने मोकळे करण्यासाठी मानकर यांनी 50 गुंड पाठवले होते. या गुंडानी घरात तोडफोड केली होती. पूर्णिमा प्रभू यांचा भाऊ राजीव प्रभू यालाही या गुंडानी मारहाण केली होती. या मारहाणीत तो जखमी झाला होता.

close