मुंबईवर ‘ड्रोन’ हल्ल्याची शक्यता, हायअलर्ट जारी

April 6, 2016 8:07 PM0 commentsViews:

mumbai terrist attackमुंबई – 06 एप्रिल : राज्याची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईवर ड्रोनच्या साह्याने अतिरेकी हल्ला करण्याचा गुुप्तचर संस्थांनी इशारा दिला आहे.

त्यामुळे मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या छोट्या विमानांनी हा हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.

पॅराग्लायडर्सचा अतिरेक्यांकडून वापर होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या एका महिन्यासाठी ड्रोन, पॅराग्लायडर्सवर मुंबईत बंदी घालण्यात आलीये. मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून महिनाभरासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close