सतीश शेट्टी हत्येप्रकरणी माजी पोलीस निरीक्षकाला अटक

April 6, 2016 8:35 PM0 commentsViews:

satish sheety4पुणे – 06 एप्रिल : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज (बुधवारी) माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना अटक केली आहे.

आंधळकर हे शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा सुरवातीला तपास करत होते. सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात आंधळकर हे स्वत: सहभागी होते असा सीबीआयला दाट संशय आहे.

2010 मध्ये सतीश शेट्टी यांची तळेगाव दाभाडेमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत झालेली ही पहिलीच अटक आहे. सतिश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी अनेकदा आंधळकर यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. आता या अटकेनंतर सतिश शेट्टी यांच्या हत्येचं गुढ उकलण्याची शक्यता निर्माण झालीय.

सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

- 13 जानेवारी 2010 ला तळेगावमध्ये हत्या
– सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे तपास
– तपासावर संशय आल्यानं संदीप शेट्टींची हायकोर्टात याचिका
– तपास सीबीआयकडे देण्याची मागणी
– हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास सीबीआयकडे
– सीबीआयनं तपास करून दिला क्लोजर रिपोर्ट
– सीबीआयच्या रिपोर्टविरोधात पुन्हा हायकोर्टात याचिका
– नव्यानं तपासाचे हायकोर्टाचे आदेश
– तपासासाठी सीबीआयायची नवी टीम
– 6 एप्रिल 2016 तब्बल सहा वर्षानंतर पहिल्यांदाच अटक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close