सराफांचा संप कारागिरांच्या जीवावर बेतला, दोघांची आत्महत्या

April 6, 2016 9:25 PM0 commentsViews:

मुंबई – 06 एप्रिल : ज्वेलर्स असोसिएशनच्या संपामुळे दोन कारागिरांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांनवर एक टक्के एक्साइज ड्युटी वाढवल्याच्या विरोधात गेल्या दीड महिन्यापासून ज्वेलर्सनी संप पुकारलाय. त्याचा सगळ्यांत मोठा फटका रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांना बसतोय.goldstrike_pkg

दक्षिण मुंबईतल्या भुलेश्वरच्या या चिंचोळ्या कारखान्यात शोककळा पसरलीये. गेल्या दीड महिन्यापासून बंगालमधून आलेल्या या सर्व कारागिरांना एक पैसाही मिळाला नाहीये. याचं दुःख तर त्यांना आहेच..पण, त्यांना धक्का बसलाय कारण त्यांच्यासोबत काम करणार्‍या सुशांत सामंता या कारागिराने आत्महत्या केलीये. जिथे गेल्या 6 महिन्यांपासून सुशांत काम करत होता. त्याच खोलीत 3 एप्रिलला गळफास घेऊन त्याने आयुष्य संपवलं.

वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी या तरुणावर आत्महत्या करण्याची वेळ आली. कारण सोन्याच्या व्यापार्‍यांनी गेल्या दीड महिन्यापासून संप पुकारलाय. ते एक टक्का वाढीव कराचा विरोध करतायत. पण, सधन व्यापारी आणि ग्राहकांपेक्षा…सगळ्यांत मोठा फटका या गरीब कारागिरांना बसलाय

नवी मुंबईत नेहरू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमित दत्ता नावाच्या आणखी एका कारागिराने आत्महत्या केलीये. या कामगारांना दिवसाला अवघे काहीशे रुपये मिळतात. काम नाही की पैसे नाहीत. त्यामुळे मुंबईतले 60 टक्के कारागीर राज्याबाहेर पडलेत.

सोने व्यापारी आणि केंद्र सरकार.. दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे हा संप मिटण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीयेत. पण हे व्यापारी कारागिरांचा फारसा विचार करताना दिसत नाहीयेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close