भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा महिना अखेरपर्यंत

March 20, 2010 2:45 PM0 commentsViews: 1

20 मार्चभाजपचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष या महिनाअखेरपर्यंत घोषित होईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी दिली आहे. सध्या जिल्हापातळीवर निवडणुका सुरु आहेत. पुढच्या चार दिवसात त्यांच्या निवडणुका पार पडतील आणि महिनाअखेरपर्यंत जिल्हा अध्यक्ष प्रदेशाध्यक्षाची निवड करतील, अशी माहिती गडकरींनी दिली. 'आयबीएन-लोकमत'ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

close