मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

March 20, 2010 2:51 PM0 commentsViews: 2

20 मार्चमध्य रेल्वेवर सीएसटी ते भायखळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. उद्या सकाळी साडेसात ते रात्री 12 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. सीएसटी ते भायखळा या दोन्ही स्टेशनदरम्यान सातवी रेल्वे लाईन टाकण्याचे काम या वेळेत होणार आहे. त्यामुळे डाऊन मार्गावरच्या फास्ट ट्रॅकवरच्या सर्व लोकल सीएसटीपासून माटुंग्यापर्यंत स्लो ट्रॅकवर चालतील. तर अप मार्गावरच्या सर्व फास्ट लोकल कुर्ला ते सीएसटीदरम्यान स्लो ट्रॅकवर चालवल्या जातील. या मेगाब्लॉकमुळे सीएसटीवरून सुटणार्‍या लांब पल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रद्द झालेल्या गाड्या- मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसपुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्पप्रेस

close