देशभरात उन्हाचा कहर, तेलंगणामध्ये तीन महिन्यांत उष्माघाताचे 66 बळी

April 7, 2016 11:35 AM0 commentsViews:

Heat wave

तेलंगणा- 07 एप्रिल : देशभरात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच 2016 मध्ये एकटया तेलंगणातच आत्तापर्यंत उष्माघाताने 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यंदाचा उन्हाळा मागील काही वर्षांपेक्षा अधिक तापमानाचा असेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

देशातील अनेक शहरात तापमानाने 40 अंशाचा पारा पार केला आहे. मेहबुबनगर जिल्ह्यात सर्वाधिक 28 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल मेडक जिल्ह्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. निजामाबादमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. खम्मम आणि करिमनगर जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अदिलाबाद आणि वारंगल जिल्ह्यात 4 जणांचा तर नालगोंडा जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व भागात मागील 24 तासात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियस इतका आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस याहुनही अधिक तापमान असेल, असा इशारा दिला आहे. एल निनो आणि जागतिक तापमानवाढ हे हवामान बदलासाठी कारणीभूत असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close