एड्स जनजागृतीसाठी हनुमान चालीसा; देश फक्त हिंदूंचा आहे का? हायकोर्टाचा सवाल

April 7, 2016 9:32 AM1 commentViews:

प्रवीण मुधोळकर, नागपूर  – 07 एप्रिल : एड्स जनजागृतीसाठी नागपूर महानगर पालिकेनं हनुमान चालिसा पठनाचा धार्मिक कार्यक्रम ठेवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा देश केवळ हिंदुंचा आहे काय आणि एड्स फक्त हिंदुंनाच होतो काय असा सवाल विचारत हायकोर्टाच्या खंडपीठानंही मनपाला चपराक लगावली आहे.

aids
नागपूर महानगर पालिकेन एड्स जनजागृती कार्यक्रमाला जास्तीतजास्त नागरिक यावेत, यासाठी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केलाय. कस्तुरचंद पार्कवर होणार्‍या कार्यक्रमासाठी महापालिका 50 लाख खर्चही करणार आहे. पण एड्स जनजागृती कार्यक्रमाला धार्मिक रंग दिल्याने हायकोर्टात स्थानिक नागरिकांनी धाव घेतली.

हा देश केवळ हिंदुंचा आहे का असा सवाल विचारत हायकोर्टाने महानगर पालिकेला फटकारलंय. एड्सचे रुग्ण केवळ एकाच धर्मात नाहीत. त्यामुळे अशा सार्वजनिक कार्यक्रमाला धार्मिक स्वरुप देता येणार नाही असंही हायकोर्टाने सांगितले आहे. एड्सच्या जनजागृतीसाठी गर्दीच जमवायची असेल तर फक्त हनुमान चालिसाच का बायबल, कुराण, धम्मपद या ग्रंथाचं पठन का आयोजीत केले नाही असंही हायकोर्टानं विचारलंय.

दरम्यान हायकोर्टाने कानउघडणी केल्यानंतर मनपाने एड्स जनजागृती आणि हनुमान चालिसा हे दोन कार्यक्रम वेगळे असल्याची भूमिका घेतली आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता हे मुलभुत काम सोडून नागपूर मनपा नेहमीच असे कार्यक्रम करून जनतेचा पैसे का वाया घालवते, असा सवाल वारंवार विचारला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Bhalchandra Gadgil

    It appears that if court had taken little interest in looking to the people susceptible to AIDS belong to poor people mostly involved in transport lines. Almost all truck ,tempo drivers do pay full faith in mandir masjid ,granthsahib whatsoever comes en route specially ghat section . Hanumanji is believed to be guard by all people barring religion . So before giving such remarks proper care was needed to encourage such programmes by any and every way .Sorry nowdays language used by courts in many verdicts is not appealing

close