विराट आणि अनुष्काची सिक्रेट डिनर डेट

April 7, 2016 2:40 PM0 commentsViews:

07 एप्रिल :  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी पुन्हा एकत्र आल्याची चर्चा सुरू झालीये. त्याला कारणही तसंच आहे, ब्रेकअपनंतर विराट आणि अनुष्का पहिल्यांदाज काल (बुधवारी) रात्री मुंबईत एकत्र दिसलं. दोघे वांद्र्यातील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आलं होतं.

आपल्याला माहीत असेलच की, टी-20 वर्ल्डकपदरम्यान अनुष्कावर झालेल्या कमेंट्सवर विराटने ‘ट्वीट’च्या माध्यमाने नाराजी व्यक्त केली होती. तर, आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्ध झालेल्या विजयानंतर अनुष्काने विराटला मेसेज केला होता.

विराट आणि अनुष्का काल रात्रीच्या सुमारास डिनर डेटला गेले होते. यावेळी अनुष्काने काळा ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि पेन्सिल स्कर्ट घातला होता. तर विराट मात्र ऑफ व्हाईट पैंट आणि स्टायलिश टीशर्ट अशा कॉज्यूअल लूकमध्ये दिसाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close