सेना, मनसे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ‘स्वाभिमान’मध्ये

March 20, 2010 2:56 PM0 commentsViews: 3

20 मार्चनाशिकमध्ये आज स्वाभिमान संघटनेचा मेळावा पार पडला. यामध्ये स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान संघटनेत प्रवेश केला. यावेळी मराठी युवकांना रोजगार मिळावा या शिवसेना आणि मनसेच्या मुद्द्यावर नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे बंधू बेरोजगार मराठी माणसाची फसवणूक करीत असल्याचे त्यांनी म्हटले.

close