प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला

April 7, 2016 3:00 PM0 commentsViews:

sdasdasdy

07 एप्रिल :  अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. कोर्टाने राहुल सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून कोणत्याही क्षणी राहुलला अटक होऊ शकते. राहुलवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारीच राहुल सिंगचे वकील नीरज गुप्ता यांनी खटल्यातून आपले वकीलपत्र मागे घेतलं होतं. अपेक्षित माहिती देत नसल्याचा कारण देत वकीलपत्र मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता त्याचा अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आला आहे.

गेल्या शुक्रवारी गोरेगाव इथल्या राहत्या घरात प्रत्युषा बॅनर्जीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राहुलविरोधात प्रत्युषाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close