गोव्यातील सरकार धोक्यात

March 20, 2010 4:50 PM0 commentsViews: 1

20 मार्चगोव्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे सरकार धोक्यात आले आहे. सरकारमधील प्रमुख घटक पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. घटक पक्षांतील असुंतष्ट 2 आमदारांसह 5 मंत्र्यांचा गट सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत आहे. या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद शनिवारी गोव्यात आले होते. त्यांनी याबाबत समन्वय समितीला सर्व अधिकार दिलेत. काँग्रेस – राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक रविवारी मुंबईत होणार आहे. मात्र त्याआधीच सरकारमधील असंतुष्ट आमदारांचा गट सक्रीय झाला आहे. त्यामुळे दिगंबर कामत सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार आहे.

close