‘मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करा’, जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

April 7, 2016 4:12 PM0 commentsViews:

bhujbal44मुंबई – 07 एप्रिल : महाराष्ट्र सदन आणि हवाला प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलीय. भुजबळ यांनी जेल मधून पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय.

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर, येवला ,नांदगाव ,देवळा ,चांदवड,निफाड या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची परवड सुरू आहे.य् ाा भागाला पिण्याचं पाणी देण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. तो पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी या पत्रात केलीय. यासाठी आपणास अनेकदा भेटलो असल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांना या पत्रात त्यांना करून दिलीये. महाराष्ट्र गुजरात सिमेवर डोंगराळ भागात मोठा पाऊस पडतो, ते पाणी अडवून मांजरपाडा येथे भिंत बांधून धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 10 किलोमीटर चा बोगदाही तयार केला आहे. आता फक्त 300 ते 400 मीटर च्या बोगद्याचं काम बाकी असताना हा सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या साठी हा प्रकल्प रखडला आहे, याचीही माहिती भुजबळांनी या पत्रात दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close