‘चला हवा येऊ द्या’मध्ये अवतरला शाहरुख खान

April 7, 2016 7:30 PM0 commentsViews:

07 एप्रिल : लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात यावेळी उपस्थित होता चक्क बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान…या खास एपिसोडमध्ये शाहरूखनं मराठमोळा फेटा बांधला होता.srk_in_chala_hava_ सर्वच कलाकारांशी त्यानं त्याच्या खास किंग खान स्टाईलनं संवाद साधला. सेटवर भाऊ कदम, कुशल बदि्रके यांनी दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगेवर एक स्कीट सादर केलं. एवढंच नाहीतर या कार्यक्रमात शाहरूखनं लुंगी डान्सही केला.

एकूणच शाहरूखनं खूपच धमाल केली. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हल्ली बॉलिवूडचे कलाकार हजेरी लावतायत. आतापर्यंत सोनम कपूर, जॉन अब्राहम यांनीही मागच्या एपिसोड्समध्ये हजेरी लावली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close