सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

April 7, 2016 8:14 PM0 commentsViews:

satishshetty_andhalkarपुणे – 07 एप्रिल : आर.टी.आय. कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला आज कोर्टात हजर केलं. त्याला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाऊसाहेब आंधळकरला सतीश शेट्टी हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आंधळकर हे शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा सुरुवातीला तपास करत होते. सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात आंधळकर हे स्वत: सहभागी होते असा सीबीआयला दाट संशय आहे. 2010 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत झालेली ही पहिलीच अटक आहे. सतिश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी अनेकदा आंधळकर यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. आता या अटकेनंतर सतीश शेट्टी यांच्या हत्येचं गुढ उकलण्याची शक्यता निर्माण झालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close