बॉलिवूडचा शहेनशहा मंत्रालयात !

April 7, 2016 8:39 PM0 commentsViews:

big_b_mantralayaमुंबई – 07 एप्रिल : आंतरराष्ट्रीय वित्तिय सेवा केंद्र विकसित करण्यासाठी मंत्रालयात आज (गुरुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी बॉलिवूडचा शेहनशहा अमिताभ बच्चन हजर होते. या केंद्राच्या सल्लागार मंडळावर अमिताभ बच्चन आहेत. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या उपस्थित होते.

मुंबईमध्ये बांद्रा येथे आंतरराष्ट्रीय वित्तिय सेवा केंद्र उभा राहतोय. ते कसं असावं याबाबत मुख्यमंत्री आणि अमिताभ यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत हे सेंटर कसं असेल त्यात काय सुविधा असतील या बाबत अधिकारी, प्रत्येक विभागातील तज्ज्ञ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 7 मिनिटांचे 3 प्रेझेन्टेशन आणि त्यावर चर्चा झाली. यासाठी नामांकित 3 कंपन्यांना बोलावण्यात आलं होतं. हे सेंटर कसं असेल, त्याचं ब्रँडिंग कसं करता येणार यावर चर्चा झाली. 60 एकर जागेवर हे वित्तिय केंद्र उभं राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close