रेल्वेच्या नकाशात दिल्ली पाकिस्तानात

March 20, 2010 5:23 PM0 commentsViews: 2

20 मार्चरेल्वेवरच्या एका जाहिरातीमुळे ममता बॅनर्जी यांचे रेल्वे खाते चांगलेच अडचणीत आले आहे. महाराजा एक्सप्रेस या नव्याने सुरू होणार्‍या रेल्वेवर जाहिरात देण्यात आलीय. त्यात भारताची राजधानी नवी दिल्ली पाकिस्तानात, ग्वाल्हेर महाराष्ट्रात, वाराणसी हे ऐतिहासिक शहर ओरिसात तर कोलकाता आणि गया ही शहरे बंगालच्या उपसागरात दाखवण्यात आली आहेत.या जाहिरातीमुळे रेल्वे खात्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे.ईस्टर्न रेल्वेने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

close