करणसिंगची ‘हॅटट्रिक’, बिपाशासोबत 30 एप्रिलला लग्नबेडीत

April 7, 2016 8:46 PM0 commentsViews:

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल बिपाशा बासू येत्या 30 एप्रिल रोजी अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. हे कळताच बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण पसरलंय. करनसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली बिपाशा यापूर्वी डिनो मौर्या, जॉन अब्राहम आणि हरमन बवेजा सोबत रिलेशनशिपमध्ये होती. तर करणचं यापूर्वी दोनदा लग्न झालं असून करनची पहिली पत्नी श्रद्धा निगम आणि दुसरी पत्नी जेनिफर विंजेट सोबत त्याचा घटस्फोट झाला. ‘अलोन’ चित्रपटात दोघंानी एकत्र काम केलंय. आणि आता हे दोघेही रिअललाईफमध्ये एकत्र येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close