बब्बर खालसाचा कट उधळला

March 20, 2010 5:40 PM0 commentsViews: 1

20 मार्च मोहालीमध्ये पंजाब पोलिसांनी बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनेचा मोठा कट उधळून लावला आहे. बब्बर खालसाच्या दोन अतिरेक्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरावर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. पळून गेलेल्या अतिरेक्याचा 2007मध्ये लुधियानात सिनेमा हॉलवर झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग होता.बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेचा तळ युरोपमध्ये आहे.

close