सरकारी नोकरीचं नियुक्ती पत्र घेऊन ‘ते’ आले आणि…

April 7, 2016 10:55 PM0 commentsViews:

 नाशिक – 07 एप्रिल : नाशिक जिल्ह्यात बेकायदा लिपीक आणि तलाठी भरती टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. या रॅकेटमुळे महसूल यंत्रणा हादरुन गेलीय. बनावट नियुक्ती पत्र देऊन या तरुणांकडून लाखो रुपये उकळण्यात आले.

शिकलेले पण बेरोजगार युवक कायम नोकरीच्या शोधात असतात. याच युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना नोकरी लावून देण्याच्या नावावर फसवणूक झालीये. साडेतीन लाख रुपये घेवून या बेरोजगांराना देण्यात आलय हे बोगस नियुक्ती पत्र…मात्र या नियुक्ती पत्रात तारखेची चूक झाली आणि उघड झाल एक मोठ रॅकेट..

nsk_pkjऑगस्ट महिन्यात होणार्‍या भरती प्रक्रियेसाठी बेरोजगार तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारतायत. त्यातील काही तरुणांना या टोळीने हेरलं. साडेतीन लाखात सौदा ठरला, 50 हजार ऍडव्हान्स घेवून नियुक्ती पत्र दिलं. हे नियुक्ती पत्र घेवून आलेल्या 9 तरुणांना अटक झालीये. तर फसवणूक करण्यार्‍या दोन तरुणांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणामागचा सुत्रधार महसूल प्रशासनातील असावा, त्या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, माहिती आणि तंज्ञनाच्या या युगात युवकांनी अशा फसवणुकीला बळी पडावं हे धक्कादायक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close