संपावर जाणार्‍या मार्डच्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार

April 7, 2016 11:04 PM0 commentsViews:

mard strike_kem07 एप्रिल : जेजे हॉस्पिटलमधील प्रशासन विरुद्ध डॉक्टरांचा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. मार्डचे डॉक्टर संपाच्या तयारीत आहे. परंतु, मार्ड डॉक्टरांच्या विरोधात सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत आहे.

जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्र विभागाच्या प्रमुख रागिणी पारेख यांना हटवण्याची मागणी संपकरी डॉक्टरांनी केली आहे. ही मागणी पूर्ण होत नसल्यानं उद्या राज्यभरातले मार्डचे डॉक्टर सामूहिक सुट्टीवर जाणार आहेत. असं झाल्यास राज्यभरातल्या सरकारी हॉस्पिटलमधल्या आरोग्यसेवेला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे त्यांच्याविरोधात मेस्मा लावण्याचे निर्देश विधान परिषद सभापतींनी दिलेत. याबाबत विधानभवनात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अधिकार्‍यांची बैठक झाली. सभापतींच्या निर्देशानुसार सरकार मेस्मा लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्डचा संप अजून चिघळण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close