राज्यभरात पाडव्याचा उत्साह, मुंबईत निघाल्या भव्य शोभायात्रा

April 8, 2016 8:49 AM0 commentsViews:

मुंबई – 08 एप्रिल  : राज्यात गुडीपाडव्याचा उत्साह दिसून येत असून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. मुंबईच्या गिरगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भव्य शोभायात्रा निघणार आहे. फडके गणेश मंदिरापासून ही भव्य शोभायात्रा निघेल.

20 फूट भारतमातेची प्रतिमा, 18 फूट महिषासूरमर्दिनीची प्रतिमा उभारण्यात आली आहे. या शोभायात्रेत 1200 तरूण-तरूणी ढोलताशांचा गजर करणार आहेत. तर डोंबिवलीतही नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहेत. काल रात्रीपासूनच डोंबिवलीत रस्त्यांवर रांगोळ्या पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडं तरूणींचे ढोलपथकही सज्ज झाले आहे.

sdsadas
डोंबिवलीच्या श्रीगणेश मंदिर संस्थानतर्फे मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य रांगोळीही साकारण्यात आली आहे. तब्बल 48 बाय 12 फुटांची ही रांगोळी असून त्यासाठी 700 किलो रांगोळी आणि 300 किलो रंग वापरण्यात आले आहेत.

तर ठाण्याच्या गावदेवी मैदानावर संस्कार भारतीतर्फे शंभर फुटांची भव्य रांगोळी साकरण्यात आली आहे. राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे पाणी वाचवण्याचा संदेश यावेळी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात येतो आहे. पाडव्यानिमित्त मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या डोंबिवली, पुणे आणि मुंबई परिसरातील स्वागतयात्रांनाही काही वेळात सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोल्हापुरातही पाडव्याची धूम पहायला मिळत आहे. येथेही सायंकाळच्या वेळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close