डोंबिवलीत भित्तीचित्र स्पर्धा

April 8, 2016 8:54 AM0 commentsViews:

07 एप्रिल :  गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढली जाणारी डोंबिवलीतली नववर्ष स्वागत यात्रा प्रसिध्द आहे.यंदाच्या स्वागतयात्रेनिमित्त गणेश मंदिर संस्थानच्या वतीने भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून डोंबिवली शहर स्वच्छ आणि पाणी वाचवण्याचा संदेश या माध्यमातून दिला आहे. डोंबिवली भित्तीचित्र स्पर्धेला 2 एप्रिलपासून सुरवात झाली आहे. त्यात 50 टीम च्या सुमारे 350 कलाकार सहभागी झाले आहेत. स्वच्छ डोंबिवलीसह अन्य थीम ही रंगविल्या जाणार आहेत.या स्पर्धेसाठी वयोगट 9 ते 72 वर्षे वयोगटातील नातवाच्या वयाच्या मुला पासून ते आजोबान पर्यंत सर्व स्पर्धकांनी भाग घेतला होता.त्यातून शहर नेटके आणि चांगले दिसण्यास मदत होणार असल्याचं नववर्ष स्वागत यात्र आयोजकांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close