मेस्मा कारवाई झुगारून मार्डचे डॉक्टर संपावर

April 8, 2016 4:17 PM0 commentsViews:

mard_doctor3मुंबई – 08 एप्रिल : जेजे रुग्णालयात सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यातच आज डोळ्यांच्या विभागातील या डॉक्टरांच्या समर्थनार्थ आज निवासी डॉक्टरांच्या संघटनेने राज्यव्यापी संप पुकारलाय. सरकारने मेस्मा लावण्याची तयारी दाखवली असतानाही मार्डने हा राज्यव्यापी संप पुकारला.

राज्यात निवासी डॉक्टरांची संख्या 4500 इतकी आहे तर जेजेत ती 400 इतकी आहे. आज रुग्णालयाला सुट्टी असल्याने ओपीडी बंद होती. त्यामुळे आज फारसा ताण नव्हता.. सरकारनं कारवाईची तयारी दाखवली तरी संप मागे घेतला जाणार नाही. जोपर्यंत डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ.रागिणी पारेख यांची बदली करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा सेंट्रल मार्डने दिलाय.

पुण्यातील मार्डच्या डॉक्टरांचा पाठिंबा

दरम्यान, आज सर्व मार्ड असोसिएशनच्या डॉक्टरांनी डीन ऑफिससमोर घोषणा देऊन मार्ड असोसिएशनच्या संपाला पाठिंबा दिलाय.पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या मार्ड असोसिएशनने देखील जेजेच्या बंदाला पाठिंबा दिलाय. बिजे हॉस्पिटलच्या असोसिएसनच्या डॉक्टरांनी आज ससून रुग्णालयातील सर्वसाधारण वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन रुग्णसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय पुणे मार्ड असोसिएशनने केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close