अनुप जवळकर आत्महत्येप्रकरणी 5 न्यायाधीशांविरोधात गुन्हे दाखल

April 8, 2016 4:43 PM0 commentsViews:

anup_javalkar3यवतमाळ – 08 एप्रिल : न्यायाधीश अनुप जवळकर आत्महत्येप्रकरणी आज 5 न्यायमूर्तीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एकाच वेळी पाच न्यायाधीशांविरोधात गुन्हे दाखल करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. महत्वाचं म्हणजे या सर्वांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

महिनाभरापूर्वी दारव्हा येथील न्यायाधीश अनुप जवळकर यांनी मांजरखेड रेल्वे फाटकाजवळ आत्महत्या केली होती. जवळकर यांच्या सुसाईड नोटच्या आधारे ही कारवाई करण्यात आलीये. जवळकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश दि. रा. शिरासाव, विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य एस. एम. आगरकर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी. एन. खडसे, वरिष्ठ न्यायदंडाधिकारी आर. पी. देशपांडे आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एच. एल. मन्वर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानुसार, पोलिसांनी या पाचही न्यायाधीशांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा भादंवि कलम 306 नुसार चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

काय आहे हे प्रकरण ?

- न्यायाधीश अनुप जवळकार आत्महत्या प्रकरण
- एकाच वेळी 5 न्यायाधीशांविरोधात गुन्हे दाखल
- आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे गुन्हे
- अनुप जवळकर यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा कोर्टात न्यायाधीश
- महिन्याभरापूर्वी रेल्वे क्रॉसिंगवर त्यांचा मृतदेह आढळला
- घटनास्थळी सापडली होती सुसाईड नोट
- चिठ्ठीत सहन्यायाधीशांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचं नमूद
- या चिठ्ठीच्या आधारे 5 न्यायाधीशांविरोधात गुन्हा दाखल

या न्यायाधीशांवर झाले गुन्हे दाखल

1. दि. रा. शिरासाव
जिल्हा सत्र न्यायाधीश, यवतमाळ

2. एस. एम. आगरकर
सदस्य, विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ

3. डी. एन. खडसे
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, यवतमाळ

4. आर. पी. देशपांडे
वरिष्ठ न्यायदंडाधिकारी, यवतमाळ

5. एच. एल. मन्वर
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, यवतमाळ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close