निळू फुले यांच्या स्मरणार्थ पुरस्कार

March 20, 2010 6:19 PM0 commentsViews: 120

20 मार्चजेष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात कला आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना 'निळू फुले सन्मान' या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ लावणी गायिका यमुनाबाई वाईकर, सामाजिक कार्यकर्ते संजीव साने आणि अभिनेते किशोर कदम यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण जेष्ठ अभिनेते ओमपुरी आणि अशोक सराफ यांच्या हस्ते 4 एप्रिल रोजी मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात होणार आहे.

close